विशाखापट्टणम
भाजपचे वरिष्ठ नेते आणि कामगार संघटनांचे नेते पी.व्ही. चलपति राव यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. निधनासमयी ते 87 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र पी.व्ही.एन माधव हे आंधप्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. चलपति राव यांनी राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी स्वतःची सरकारी नोकरी सोडली होती. चलपति हे भाजपमधील अत्यंत वरिष्ठ नेते मानले जायचे. कामगार संघटनांमध्ये त्यांनी विशेष भूमिका बजावली होती.









