सावंतवाडी –
सावंतवाडी शहरातील न्यू सबनीसवाडा येथील रहिवासी व जेष्ठ कायदेतज्ञ ॲड . श्रीधर सावळाराम पराडकर , वय 85 यांचे आज गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ , भावजया पुतणे असा मोठा परिवार आहे. रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी सुधीर पराडकर यांचे ते बंधू होय. सावंतवाडी वकील संघटनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









