Sengol in Tamil : नव्या संसद भवनात पारंपरिक राजदंड ठेवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.२८ तारखेला संसद भवनाच उद्घाटन होणार आहे.यावेळी ऐतिहासिक राजदंडाच पुर्नजिवन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक राडदंडाला सेंगोल असे म्हणतात.याचा सर्वात पहिला वापर पंडित जवाहरलला यांनी केला होता,अशी माहिती अमित शाह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित केले जाईल, त्याच दिवशी तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हे सेंगोल देण्यात येणार आहे.त्यानंतर हे सेंगोल संसदेत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे”. नव्या संसद भवन उद्घाटनाला सेंगोल का आणलं जाणार आहे?सेंगोंलचा इतिहास काय आहे हे आज आपण या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.
‘सेंगोल’चे मूळ ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुरू केलेल्या पद्धतींवरून शोधले जाऊ शकते. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना थेट प्रश्न विचारला होता की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ता हस्तांतरित करणे म्हणजे काय? या प्रश्नावर काहीकाळ नेहरूही गोंधळले. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो अणि सांगतो अस नेहरू म्हणाले असल्याचं असं अमित शाह यांनी सांगितलं.
यानंतर पंतप्रधान नेहरूंनी देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचा सल्ला घेतला. राजगोपालाचारी हे वकील, लेखक, इतिहासकार आणि राजकारणी होते. राजगोपालाचारी यांना राजाजी म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी तामिळ परंपरेचे वर्णन सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून केले आहे. ज्यामध्ये जुन्या राजाने राजदंड नव्याने राज्याभिषेक केलेल्या राजाकडे सोपविला ज्याला सत्ता हस्तांतरित करण्याचे प्रतीक मानले जाते. हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे.चोला राजवटीत साजरी केलेली ही परंपरा ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्वाचे प्रतीक म्हणून काम करू शकते, असे त्यांनी सुचवले. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणासाठी राजदंड उचलण्याची जबाबदारी राजाजींनी घेतली.
14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री पंडित जवाहरलाल यांनी तमिळनाडू येथून आलेल्या सेंगोलचा स्विकार केला.यासाठी संपूर्ण विधी करून त्याचा स्विकार केला होता त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेला पूर्ण केलं होते.यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद होते.
भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला राजदंड सुरक्षित ठेवण्याची जिकिरीची जबाबदारी घेऊन राजाजी आजच्या तामिळनाडूतील थिरुवदुथुराई एथेनियम या प्रमुख धार्मिक संस्थेत पोहोचले.त्या वेळी मठाच्या अध्यात्मिक नेत्याने स्वतःच्या इच्छेने कार्य हाती घेतले. प्रसिद्ध ज्वेलर वुम्मीदी बंगारू चेट्टी यांनी ‘सेंगोल’ तयार केले होते. या प्रभावी राजदंडाची लांबी पाच फूट आहे.त्याच्या वर एक ‘नंदी’ बैल आहे, जो न्यायाचे प्रतीक आहे.
सेंगोल हे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक कसे बनले?
मठाच्या एका ज्येष्ठ पुजार्याने सुरुवातीला माउंटबॅटनला राजदंड दिला, परंतु थोड्याच वेळात तो त्यांच्याकडून परत घेण्यात आला. त्यानंतर राजदंड गंगेच्या पाण्याने शिंपडून पवित्र करण्यात आला.यानंतर पंतप्रधान नेहरूंकडे मिरवणुकीत नेण्यात आले आणि मध्यरात्री सुमारे 15 मिनिटे आधी त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या क्षणाचे संकेत दिले. या महत्त्वाच्या घटनेच्या स्मरणार्थ, एक विशेष गीत तयार करण्यात आले आणि पंतप्रधान नेहरूंनी राजदंड स्वीकारला.आध्यात्मिक एकीकरण आणि भावनात्मक एकता असा उद्देश नेहरूंचा असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.