शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. काल विधानसभा गृहात राजन साळवी यांना मतदान करणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) शिंदे गटात सामील झाले आहेत. काल उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यासोबत असणारे बांगर आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
संतोष बांगर हे शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्यावर टीकाही केली होती. त्यांच्या हिंगोली मतदार संघात बंडखोरांचे पुतळे दहन केले होते. आंदोलन केले होतं. एवढेच नाही तर आमदार झाल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी प्रामाणिक राहणार असे वचन घेतले होते. मला एवढा सन्मान फक्त शिवसेनेमुळे मिळाला आहे. ”उध्दव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” असा नारा ही त्यांनी लगावला होता. मात्र एका रात्रीत अस काय झाल की, कालपर्यंत उध्दव ठाकरे यांच्यासोबत असणारे बांगर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासोबत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
हेही वाचा- शिंदे सरकारची आज कसोटी, आघाडी विघ्न आणणार?
एकनाथ शिंदे गटाने सेनेला धक्का दिला आहे. काल त्यांनी विश्वास दर्शक ठरावात आमची संख्या वाढणार असं काल शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ४० आमदार शिंदे यांच्यासोबत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









