Seminar on “Aipan Nibhavatana” held by Vengurlet Muktangan
आपली लेकरं हि आपल्याला, या जीवनाने दिलेली एक सुंदर, अपूर्व अशी भेट आहे. त्यांच्यामुळेच आपल्या जगण्याला एक नवा अर्थ आलाय त्यांनी आपण नीट उमलू देऊया असे प्रतिपादन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर यांनी बालदिनाच्या आईपण निभावताना' या विशेष परिसंवाद केले. वेंगुर्ले येथील मुक्तांगणच्या सभागृहात बालदिनाचे औचित्य साधून मुक्तांगण महिला मंच व बालविकास प्रकल्पातर्फे बालदिन विशेष अंतर्गतआईपण निभावताना’ हा परिसंवाद आयोजित करण्यांत आला होता. या परीसंवादाचे अध्यक्षपद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. संजना तेंडोलकर यांनी भुषविले. यावेळी उपस्थितांत मुक्तांगणच्या संचाालिका मंगल परूळेकर, सौ. दिव्या आजगांवकर, सौ. श्रध्दा बोवलेकर, सौ. साक्षी वेंगुर्लेकर, सौ. गौरी माईणकर, सौ. स्वाती बांदेकर, सौ संजना तेंडोलकर यांना विद्यार्थ्याचा समावेश होता.
या बालदिनाच्या कार्यक्रमात, विद्यार्थी आणि पालक यांना घडविणारी एक अभिनव प्रयोगशाळेतील आम्ही पालक एक संशोधक आहोत. मुलांबरोबरच घडत, वाढत जाण्याची प्रक्रिया काय असते. हे आम्ही मुक्तांगणमध्येच अनुभवले आणि समृध्द होत गेलो. एक सुजाण पालक म्हणून आम्ही आज मुलांच्या विकासाच्या दृष्टीने काय विचार केला पाहिजे याचे मार्गदर्शन मुक्तांगणच्या पालक शाळेत घेतो. असे मत सौ. दिव्या आजगांवकर यांनी व्यक्त केले.
बालदिनाचे औचित्य साधून मुक्तांगण महिला मंच व बालविकास प्रकल्पातर्फे आईपण निभावताना हा परिसंवाद आयोजित करण्यात आला.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









