डफळापूर/वार्ताहर
त तालुक्यातील डफळापुरसह पश्चिम भागातील द्राक्ष बागायतदार व ऊस उत्पादक शेतकरी बांधव यांची व्यापारी वर्ग व तोडणी वाहतूकदार यांच्याकडून होणारी अडवणूक थांबविण्यासाठी रविवारी दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डफळापुर ग्रामपंचायतीच्या सभागृहात डफळापूर विकास सोसायटीच्या वतीने चर्चा सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डफळापूर विकास सोसायटीचे उपाध्यक्ष पोपटराव ऊर्फ बाळकृष्ण पुकळे यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.
सदर चर्चासत्रात ऊस तोडणी, ऊस कारखान्याला पाठविणे, द्राक्ष बागायतदार यांच्या द्राक्ष माल दराविषयी चर्चा करून शेतकरी व बागायतदार यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदरचे चर्चा सत्र आयोजित केले. असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर चर्चा सत्रास शेतकरी व बागायतदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चर्चासत्राचा विनामूल्य लाभ घ्यावा, असे आवाहन डफळापूर विकास सोसायटीचे उपाध्यक्ष पोपटराव ऊर्फ बाळकृष्ण पुकळे यांनी केले आहे.








