केंद्राच्या ‘स्वच्छ भारत उन्नत भारत’ अंतर्गत प्रकल्प
अहिल्या परकाळे कोल्हापूर
‘पंचगंगा’ ही कोल्हापूर, इचलकरंजी शहराची जीवनरेखा.. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे औद्योगिक सांडपाणी थेट नदीत मिसळल्यामुळे तिचे दुषीत पाणी पिण्यासाठी अयोग्य होते. पंचगंगा प्रदुषण रोखण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. अविराज कुलदीप यांना केंद्राने स्वच्छ सारथी फेलो अॅवॉर्ड दिले आहे. यांतर्गत पंचगंगेतील प्रदूषण रोखण्यासाठी सेमीकंडक्टर फोटोकॅटलिस्टचा उपयोग ते करणार आहे. ‘स्वच्छ भारत उन्नत भारत’ मिशन अंतर्गत डॉ. कुलदीप हे संशोधन करणार आहेत.
कापडासाठीच्या केमिकलयुक्त रंगांमुळे औद्योगिक सेंद्रीय प्रदूषकांमुळे मानवी जीवनावर घातक परिणाम होत आहेत. हे दुषित केमिकलयुक्त पाणी नाल्यांवाटे जलस्त्राsतांत, नदीत सोडले जाते. वास्तविक, केमिकलयुक्त सांडपाण्यात हायकोड्रोलिसिस, ऑक्सिडेशन किंवा रासायनिक अभिक्रियांद्वारे घातक उत्पादने तयार करू शकतात. डाई प्रदूषकांच्या उच्चाटनासाठी पारंपरिक तंत्रे फक्त सेंद्रिय संयुगे पाण्याच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात वहन करतात. त्यातूनच पारंपरिक जैविक उपचार पद्धतीमुळे अधोगती होत आहे. शिवाय, रंगांचा मोठा भाग फक्त गाळावर शोषला जातो. विशिष्ट रंगांना वगळण्यासाठी ओझोनेशन, क्लोरीनेशन देखील वापरले जाते. परंतु या प्रक्रियेचा वेग कमी होत असल्याने आणि वारंवार तेच काम करावे लागते. यावर सेमीकंडक्टर फोटोकॅटलिस्ट हे पर्यावरणीय क्लीनअप तंत्रज्ञान आहे. म्हणून फोटोकॅटलिस्टचा वापर करून प्रदूषकांचे रेणू स्थिरपणे खंडीत केले जाणार आहेत. फोटोकॅटलिस्टच्या वापरामुळे सांडपाणी प्रक्रिया व निसर्गाचे संरक्षण होते.
जलस्त्रोतातील किटकनाशकांचे उच्चाटन होणार
औद्योगिक सांडपाणी, कचरा थेट पाण्यात सोडला जातो. फवारणी प्रक्रियेदरम्यान भूजल आणि पृष्ठभाग दूषित होतात. व्यावसायिक किटकनाशके पाण्यात मिसळल्यामुळे जलस्त्रोत दूषित होतात. प्राणघातक, नॅनो-बायोडिग्रेडेबल, रासायनिकदृष्ट्या स्थिर आणि सजीवांच्या शरीरात दिर्घकाळ टिकते. प्रदूषित जलस्त्रोत, हवा आणि मातीतून किटकनाशकांच्या उच्चाटनासाठी फोटोकॅटलिस्टचा वापर होणार आहे.
‘वेस्ट टू वेल्थ’ मिशनचे उद्दिष्ट
कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, उपयोजित करणे, ऊर्जा निर्मितीचे वचन देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठींबा देण्यासाठी हे मिशन कार्यरत आहे. देशातील कचरा हाताळणी सुव्यवस्थित, कचरा व्यवस्थापनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असे आर्थिक मॉडेल तयार करण्यासाठी हे मिशन विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना वापरून स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांना मदत करण्यास तत्पर आहे.
घटनास्थळी जाऊन संशोधन करणार
जिल्ह्यात जास्तीत जास्त साखर कारखाने, वस्त्रोद्योग आहेत. त्यांचे सांडपाणी पंचगंगेत सोडले जाते. त्यामुळे पाणी दुषीत होऊन जलचरांचा मृत्यू होतो. मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो. दुषित पाण्यावरील उपाय-योजना आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी आधुनिक यंत्रणा वापरून प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन दुषीत पाण्याचे नमुने तपासले जातात. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील पंचगंगा नदीमधील पाणे प्रदूषण व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर संशोधनासाठी सेमीकंडक्टर फोटोकॅटलिस्टचा वापर केला जात आहे.
डॉ. अविराज कुलदीप (संशोधक)
सेमीकंडक्टर व फोटोकॅटलिस्ट म्हणजे काय ?
सेमीकंडक्टर म्हणजे तीन प्रकारचे धातू आणि ऑक्सिजनचे मिश्रण असते. हे झिरो डिग्री सेल्सिअस ते कमी तर जसजसे तापमान वाढेल तसतसे ते वाढत जाते. फोटोकॅटलिस्ट लाईट शोषून घेत इलेक्ट्रॉन व होल्सचे मिलन होऊ देत नाही. त्यामुळे जलप्रदुषण रोखण्यास मदत होते. म्हणूच पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी सेमीकंडक्टर व फोटोकॅटलिस्टचा वापर केला जाणार आहे.









