ट्विटरच्या विक्रीनंतर मस्क यांच्या मागे विघ्न ः श्रीमंताच्या यादीमधील स्थानही घसरले
वृत्तसंस्था/ वी दिल्ली
ट्विटर विकत घेतल्यानंतर जगातील दुसऱया क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे संपत्तीच्या बाबतीत सातत्याने मागे पडत आहेत. एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घसरणीचा कल सुरु आहे. परिस्थिती अशी झाली आहे, की मस्क आपल्या इलेक्ट्रॉनिक कार कंपनी टेस्लाचे समभाग विकत आहेत.
अवघ्या तीन दिवसांत त्यांनी 2.2 कोटी समभाग विकले आहेत, ज्याची किंमत सुमारे 3.6 अब्ज डॉलर आहे. तत्पूर्वी, एलॉन मस्क यांनी 28 एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले की टेस्ला विकण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. रॉयटर्सच्या बातमीनुसार, एलॉन मस्कने एका वर्षात सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे टेस्लाचे समभाग विकले आहेत. टेस्लाचे 94,202,321 समभाग सरासरी 243.46 प्रति डॉलर समभाग या दराने विकण्यात आले आहेत.
कंपनीत किती हिस्सा आहे?
या दराने मस्क कंपनीचे समभाग का विकत आहेत हे स्पष्ट झालेले नाही. वित्तीय बाजार डाटानुसार, मस्कच्या समभागाच्या विक्रीनंतरही, मस्क कंपनीचा सर्वात मोठा भागधारक आहे. त्यांची कंपनीत 13.4 टक्के भागीदारी आहे. गेल्या वर्षी कंपनीचे बाजारमूल्य 1 लाख कोटी डॉलर होते.
मुकुट गमावला
एलॉन मस्कच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. अलीकडेच, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जात होते. एकेकाळी त्यांची संपत्ती 340 अब्ज डॉलर्स होती, जी एका वर्षात त्यांची संपत्ती 100 दशलक्षने घसरून 163.1 अब्ज डॉलरवर आली आहे. बर्नार्ड अर्नाल्टच्या संपत्तीत वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती 170.6 अब्ज डॉलरवर पोहोचली.
3 दिवसात 2 कोटी समभाग विकले
एलॉन मस्कने इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे 2.2 दशलक्ष समभाग विकले आहेत. 12 ते 15 डिसेंबर दरम्यानच त्यांनी हे समभाग विकल्याची माहिती आहे. ट्विटर 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी, त्याने टेस्लाचे 1.95 दशलक्ष समभाग विकले, ज्यामुळे त्याला 3.95 अब्ज डॉलर मिळाले. मस्क काहीही न बोलता समभाग विकत असल्याने शेअरधारकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. स्पेसएक्सच्या सीईओने ऑक्टोबरमध्ये ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचा ताबा घेतला.









