माणसाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. अलिकडच्या काळात वाढलेल्या प्रदूषणामुळे माणसाला तुलनेत प्रतिकूल वातावरणात जगावे लागत आहे. सध्या माणसाला श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळत नसल्याचे चित्र आहे. वायू प्रदूषणामुळे अनेक लोकांना श्वसनाचा आजार जडला आहे. अनेक घातक घटक वातावरणात मिसळले गेले आहेत.

अशा स्थितीत लोक स्वच्छ अन् साफ हवेसाठी कमी प्रदूषित भागात राहण्याचा विचार करत असतात. परंतु आता प्रदूषण नसलेले ठिकाण शिल्लक राहिलेले असण्याची शक्यता कमी आहे. परंतु माणसांच्या या समस्येला लियो डे वॉट्सने व्यवसायात बदलून टाकले आहे. लियो हा बाटलीत हवा भरून ती विकत आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे त्याच्या या व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हणजेच अनेक लोक त्याच्याकडून विकण्यात येणाऱ्या बाटलीबंद हवेला खरेदी करत आहेत. बाटलीबंद हवा बाजारात एक लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
दरवर्षी हवेची गुणवत्ता खराब होत चालल्याचे मला आढळून आले होते. हिवाळ्यात प्रदूषणामुळे अनेक लोकांना श्वास घेणेच अवघड ठरते. ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी हवा साफ आहे. अशा ठिकाणांवरून हवा बाटलीत भरून ती विकण्यास सुरुवात केल्याचे तो सांगतो. अनेक लोक त्याचे हे उत्पादन खरेदी करत आहेत. लियो आता एक यशस्वी व्यावसायिक ठरला आहे. लोकांना त्याची हवा विकण्याची कल्पना अत्यंत पसंत पडत आहे.









