पणजी : सर्व स्तरावरील सर्वसामान्य लोकांचा विचार करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आहे. असे कळंगुटचे आमदार मायकल लोबा यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विविध योजंनासाठी आर्थीक तरतूद करण्यात आली आहे. गोवा स्वयंमपूर्ण करण्याच्या दिशेने हा अर्थसंकल्प आहे असेही मायकल लोबो म्हणाले. पावसाळी अधीवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा करताना मायकल लोबो बोलत होते. सरकारने तयार केलेल्या विविध योजना अमलात आणल्यास बेरोजगार युवा वर्ग स्वयंमपूर्ण होईल त्यासाठी अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी पेलेल्या आर्थिक तर्तूदींची अमंल बजावणी होणे तसेच त्या योजना युवकांपर्य सहजपणे पोचणे महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री योजनेसाठी अर्थसंकल्पात आर्थीक तर्तूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या युवकाला मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घ्यायचे झाल्यास त्याला साक्षिदार शोधणे, कागदपत्रे गोळा करणे असे अनेक खटाटोप करावे लागतात. त्यामुळे नंतर तो युवक कंटाळून कर्ज घेतच नाही. त्यासाठी एक खिडकी योजना करावी आणि सारक्षिदार द्यावे लागणार नाही यासाठी काहीतरी उपाय योजना करावी असे मायकल लोबो म्हणाले. खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय हा गोव्याचा मुख्य व्यवसाय बनला आहे. या व्यवसायासाठी सरकारच्या एनक योजना आहेत. त्या योजना युवकांपर्यंत सहज आणि सोप्या पध्दतीने पोचणे आवश्यक आहे.
गोव्याचा मच्छिमार हा पारंपरीक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यास युवक इच्छूक आहेत. या व्यवसायासाठी काही योजना तयार करण्यात आल्या असून आर्थिक संकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. मात्र बेकायदेशीर रित्या एलईडी लाईटच्या सहाय्याने मच्छिमार करणाऱ्या परप्रांतीयांचा स्थानिक युवकांना त्रास होत असतो. शेजारील राज्यातील मच्छिमार गोव्यातील समूद्रात येऊन मासेमारी करीतात. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मासे मिळत नाही. स्थानिक युवक या व्यवसायाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी एलईडी लाईट वापरणाऱ्यावर पूर्णपणे बंदी घालायला हवी असे मायकल लोबो म्हणाले.
समाज कल्याण खात्याकडून महिला, जेष्ठ नागरिकांना व विषेश क्षमतेच्या मुलांना मिळाणारे आर्थिक सहाय्य वेळोवेळी मिळणे फार महत्वाचे आहे. अर्थसंकल्पात यासाठी तर्तूद करण्यात आली आहे. मात्र ते पैसे त्यांना उशीरा मिळतात. जेष्ठ नागरीक किंवा महिला याच पैशावर अवलंबून असतात असेही मायकल लोबो म्हणाले. विज, पाणी यासाठीही आर्थिक संकल्पात बऱ्या प्रमाणात तरतूद केली असताना विज, पाण्याच्या समस्या निर्माण होत असतात. नियमित विजची समस्य सर्व सामान्य लोकांना सतावत असते. पाण्याचा वितरण योग्य रितीने होत नसल्याने लोकांना अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुले पाणी आणि विजेच्या समस्या सुटणे महत्वाचे आहे असेही मायकल लोबो यांनी सांगितले. शिक्षण व अन्य अनेक गोर्ष्टींसाठीही अर्थसंकल्पात आर्थि तरतूद करण्यात आली आहे. गोवा स्वयंम पूर्ण चांगला करायचा असल्यास सर्वांनी एकत्रीतपणे काम करणे महत्वाचे आहे असचे मायकल लोबो म्हणाले.









