कबनूर वार्ताहर
तीन वर्षाहून अधिक काळ कबनूर नगरपरिषद होण्यासाठी कृती समितीकडून लढा सुरू आहे. निर्णय होईपर्यंत हा लढा चालूच राहणार त्याचाच भाग म्हणून कृती समितीच्या वतीने येत्या 26 जानेवरी रोजी मंत्रालयाच्या दारात पाच कार्यकर्ते आत्मदहन करणार व दहा कार्यकर्ते एक दिवशी लाक्षणिक उपोषण तसेच याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय समोर दहा कार्यकर्ते लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कबनूर तालुका हातकणंगले हे निम शहर म्हणून ओळखले जाते.या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गावची लोकसंख्या 65 हजार हून अधिक आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात येथील ग्रामपंचायत नागरिकांना नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे.कबनूर नगर परिषद कृती समितीच्या वतीने कबनूर हे स्वतंत्र नगरपरिषद व्हावे यासाठी गेली तीन वर्षाहून अधिक काळ पाठपुरावा करत यासाठी रान उठवले आहे.मंत्री खासदार, आमदार, अधिकारी, पदाधिकारी यांच्यापर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
कृती समितीकडून या तीन वर्षांमध्ये गाव पातळी ते थेट मंत्रालयापर्यंत चर्चा बैठका केल्या.आमरण उपोषण सारखे आंदोलन उभे केले.निवेदने दिली. खासदार व आमदार यांनी नगरपरिषद होण्यासाठी आमच्या परीने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली आहे.तरी देखील हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये हा प्रस्ताव आहे.खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांचेही सहकार्य लाभले आहे.त्याच बरोबर काही पक्षाचे पदाधिकारी यांनीही या लढ्यास सहकार्य करीत आहेत.प्रशासन हे गांधारीचे रूप घेत आहे.गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा प्रतिक्रिया तुमच्याच आहेत.
एकंदरीत गावाचा विकास खुंटलेला आहे.कबनूर स्वतंत्र नगरपरिषद झाल्यास गावाला शासनाकडून भरून निधी मिळेल व त्यातून गावचा विकास होईल या हेतूने या लढ्याला यश यावे व कामाला गती मिळावी यासाठी येत्या 26 जानेवारी रोजी कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या वतीने मंत्रालयाच्या दारात कृती समितीचे अजित खुडे, उत्तम जाधव, नितीन गवळी, युवराज कांबळे, गणेश रेणके हे पाच कार्यकर्ते आत्मदान करणार आहेत. त्याचबरोबर समितीचे दहा कार्यकर्ते त्याच दिवशी एक दिवशीय लक्षणे उपोषण करणार आहेत.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर समितीचे सदस्य हे एक दिवशी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या बैठकीत दत्ता शिंदे, अजित खुडे, सुधाकर कुलकर्णी, उत्तम जाधव यांनी नगरपरिषद बाबत म्हणणे मांडले.या बैठकीस दत्ता पाटील,रियाज चिकोडे,रवी धनगर,विकास फडतारे, सतीश पाटील, राहुल महालिंगपुरे, नितीन गवळी, महेश शिरोडक,र अभिजीत केटकाळे, युवराज कांबळे, इमरान सनदी, रघुनाथ हळवणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .आभार जावेद फकीर यांनी मानले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









