ड्रायव्हरशिवाय धावते स्वयंचलित झेडपॉड : स्टेअरिंग व्हील, डॅशबोर्डही नाही
बेंगळूर : पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या वाहनांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. वायू प्रदूषण आणि इंधन बचतीसाठी आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बहुतेक लोक हाच दृष्टिकोन ठेवून इलेक्ट्रिक कार व दुचाकी खरेदी करताना दिसत आहेत. विदेशात ड्रायव्हरलेस (स्वयंचलित) कार रस्त्यावर धावताना दिसतात. अशीच एक कार बेंगळूरमध्ये रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिऊद्ध रविशंकर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकौंटवर ड्रायव्हरलेस कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला ‘बेंगळूरच्या रस्त्यावर’ असे पॅप्शन दिले आहे. सदर व्हिडिओत दोन तऊण कारकडे कुतूहलाने पाहत आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ 12 हजारहून अधिक जणांनी बघितला आहे. त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. सदर कार बेंगळूरस्थित ‘मायनस झिरो’ नावाच्या स्टार्टअप कंपनीने ‘झेड पॉड’ नावाचे स्वयंचलित वाहन बनविले आहे. गेल्या दोन दिवसांत फ्रेजर टाऊनजवळ हे वाहन दोनदा दिसल्याचे सांगण्यात येत आहे. हे भारतातील पहिले सेल्फ ड्रायव्हिंग वाहन म्हणून ओळखले जाते. हे वाहन चार आसनी आहे. त्यात डॅशबोर्ड किंवा स्टेअरिंग व्हील नाही. त्याऐवजी ते कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे रस्त्यावर दिशा व मार्ग निश्चित करते. या वाहनाला बाहेरील बाजूस पॅमेरेही आहेत. या वैशिष्ट्यापूर्ण वाहनामुळे बेंगळूरवासियांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.









