रत्नागिरी :
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’च्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत 6 किनाऱ्यांवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहे.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’ विथ ‘बायो डायजेस्टर’चे आणि चेजिंग ऊमच्या एकूण 9 युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 5 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
कोकणाच्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी दर दिवशी हजारो पर्यटक राज्यातील विविध भागातून येत असतात. परंतु या पर्यटकांसाठी किनाऱ्यावर शौचालय वा चेंजिगऊमची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची गैरसोय व्हायची. पर्यटकांची ही गैरसोय दूर व्हावी या दृष्टीकोनातून समुद्र किनारी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट असावे अशी संकल्पना भाजपच्या महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडली होती.
भाट्यो, गणपतीपुळे, गणेशगुळे (रत्नागिरी), वेळणेश्वर (गुहागर), लाडघर (दापोली) व मुऊड (दापोली) या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेजिंग ऊम युनिट बांधण्यात येणार आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 5 कोटीचा निधी उपलब्ध कऊन दिला आहे. या युनिटच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचेही सहकार्य लाभले. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.
- किनाऱ्यांवर मंजूर झालेले सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट व चेंजिंग रुम
ठिकाणे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट चेंजिंग रुम
भाट्यो 2 युनिट 2 युनिट
गणपतीपुळे 2 युनिट 2 युनिट
गणेशगुळे 1 युनिट 1 युनिट
वेळणेश्वर 1 युनिट 1 युनिट
लाडघर 1 युनिट 1 युनिट
मुऊड 2 युनिट 2 युनिट
- मांडवी किनाऱ्यावर ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’चे 9 रोजी उद्घाटन
येथील मांडवी किनाऱ्यावर भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिट बांधण्यात येत आहे. या युनिटचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 9 एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे.








