भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के युवा पिढी ही भारताच्या लोकसंखेमध्ये सामील होते.देशातील युवक हा विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याच बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३ वा नंबर लागतो. जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारीनुसार तरुणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक ३४ तर युवती ८० आत्महत्या करतात. ही आत्महत्या रोखली जावी म्हणून जागतिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युवकांची देशभरातून भारतातील तरुणांसाठी आत्महत्या प्रतिबंधाला प्राधान्य देणे या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्य़ात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातून विनायक हेगाणा याची निवड करण्यात आली आहे.
ही बैठक शिक्षण मंत्रालय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण भारत सरकार व मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई यांच्या वतीने दिल्ली येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पार पडणार आहे. यासाठी विनायक हेगाणा या महाराष्ट्रातून एकमेव युवकांची निवड करण्यात आली आहे.
मुळचा अर्जुनवाड ता. शिरोळचा विनायक मागील 8 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात उविरतपणे काम करत आहे. शिवार संसद युवा चळवळ उभी करून ३००० शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे.आत्महत्या होऊच नये यासाठी “शिवार हेल्पलाइन” या संशोधनपर संकल्पनेतून आतापर्यंत १९५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले आहे.याची राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून विद्यापीठ स्तरावर,टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स,मुंबई,आय.आय.टी मुंबई व निती आयोग भारत सरकार मार्फत ही दखल घेण्यात आली आहे.
जगातील १८ देशातून ३२ युवकांमध्ये जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या(UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देवून गौरविण्यात आले आहे. विनायकने आतापर्यंतच्या मानसिक आरोग्य व आत्महत्या या विषयावरील योगदानामुळे या राष्ट्रीय सल्लागार परिषदेत तो मार्गदर्शन करणार आहे.
Previous Articleसोनुर्लीतील नवयुवक कला क्रिडा मंडळाचा दानशूरपणा
Next Article हवाईदलाची तीन विमानं दुर्घटनाग्रस्त









