वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत शिवाजी हायस्कूल कडोली येथे झालेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या मुलांच्या थ्रो बॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघात सुशांत गुरव, भारत बेळगावकर, अवधूत कणबर्गी, समर्थ मांजरेकर, समर्थ हावळ, कृष्णा देवलस्कर, शाम चौगुले, पृथ्वीराज सुळगेकर, शिवम गुंजीकर, महादेव देवलस्कर, गोविंद घाडी, प्रीतम सुतार, सुजल लाड आदी खेळाडूंचा समावेश आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळविला व प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. मुख्याध्यापक ए. बी. पाटील, क्रीडा शिक्षक पी. के. चव्हाण, सहशिक्षक अजित नाकाडी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.









