बेळगाव : खडेबाजार येथील नामदेव दैवकी संस्थेच्या संचालक मंडळ व पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष नारायण काकडे यांच्या नेतृlवाखाली बैठक झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अजित कोकणे, उपाध्यक्षपदी अशोक रेळेकर, सेक्रेटरीपदी शशिकांत हावळ, उपसेक्रेटरी हेमंत हावळ, खजिनदार रोहन उरणकर यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळावर दीपक खटावकर, विलास खटावकर, भाऊ मुसळे, सुरेश पिसे, सुनील रोकडे, निरंजन बोंगाळे, माfहला संचालक लिलावती रेळेकर या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाची पंचवार्षिक निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकार्यांना समाजबांधवांच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. नारायण काकडे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करत गौरवाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी अमर कोपर्डे, यशवंत परदेशी, प्रवीण कणेरी, देवेंद्र हावळ, रवी पिसे, अजित कोळेकर, महेश खटावकर, सुहास खटावकर, उमेश पिसे, संतोष राजगोळकर यासह समाजबांधव उपस्थित होते.









