Selection of Sumedha Tondwalkar of Sindhudurg College in Border Security Force
स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातची एनसीसी कॅडेट आर्ट्स विभागातून शिक्षण घेतलेली कुमारी सुमेधा प्रकाश तोंडवळकर हिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झाली कू.सुमेधा ही अत्यंत प्रामाणिक होतकरू व कष्टाळू मुलगी आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर तिने हे यश संपादन केलेले आहे. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत. तसेच कृ सी देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब वालावलकर ,संस्थेचे सेक्रेटरी माननीय चंद्रशेखर कूशे , संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी , कॉलेजमधील सर्व प्राध्यापक वर्ग , ऑफिस स्टाफ, इतर कर्मचारी वर्ग, यांनी सुमेधाचे अभिनंदन व कौतुक केले . जे विद्यार्थी कॉलेज करत असताना एनसीसी मध्ये प्रवेश घेतात त्यांना सिक्युरिटी गार्ड ,पोलीस भरती ,आर्मी भरती मध्ये सवलत दिली जाते तसेच वेगवेगळ्या कंपन्या, पॅरामिलिटरी , स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी सी सर्टिफिकेट होल्डर्स विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. आर्मी भरती मध्ये एनसीसी कॅडेट्स ‘सी ‘ सर्टिफिकेट होल्डर असेल तर त्याला लेखी परीक्षा नसते फक्त फिजिकल फिटनेस पाहिला जातो त्यामुळे कॉलेज करत असताना एनसीसी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होतो . सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा आलेख नेहमी चढताच राहील..जास्तीत जास्त एनसीसी कॅडेट्स पोलीस भरती ,आर्मी भरती, तटरक्षक दल, अग्नीवीर, सिक्युरिटी गार्ड, महाराष्ट्र कॅडेट फोर्स यामध्ये भरती करण्याचे उद्दिष्ट आपले आहे असे एन सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम .आर खोत. व प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले.
मालवण / प्रतिनिधी









