वार्ताहर /खानापूर
शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुका पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर येथील विद्यार्थिनींनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले.
योगामध्ये तन्वी गंगाराम पाटील प्रथम, आर्टिस्टिक योगा- अमृता अर्जुन घाडी प्रथम, बॅडमिंटन- सोनिया विष्णू पाटील प्रथम, नाबिया झेड मुल्ला, फेलसीटा बी डिसोजा, पूजा पी चौगुले, कुस्ती -कीर्ती बळवंत पाटील प्रथम (53 किलो वजन गटात), विद्याश्री प्रवीण चोपडे प्रथम (55 किलो वजनगटात) उंच उडी- सोनाली मल्लाप्पा मुदगेकर द्वितीय आली आहे. ट्रिपल जंप -सोनाली मल्लाप्पा मुदगेकर द्वितीय, स्वीमिंगमध्ये पूजा केदारी भेकणे व यल्लूताई मारुती गोरे दोघीही प्रथम. तीन हजार किलोमीटर धावणे- गुणवंती परशराम गुरव तृतीय आली असून या विद्यार्थिनींची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई नागराजू, ज्ये÷ संचालक शिवाजीराव पाटील व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले. व शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव व क्रीडा शिक्षिका व सर्व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले.









