क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गुजरातमधील अहमदबाद येथे होणाऱया 36 व्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर देवेन बामणे आणि जयध्यान राज यांची कर्नाटक संघात निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केलेल्या देवेन बामणे व जयध्यान राज यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली. केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे ते सराव करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, भरत पाटील, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









