बेळगाव : विनू मंकड चषक 16 वर्षाखालील वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटकाच्या 48 खेळाडूंच्या संभाव्य यादीत बेळगावच्या सिद्देश असलकर, आकाश कुलकर्णी व आशुतोष हिरेमठ तर धारवाडच्या मनिकांत बुकीटगार यांना स्थान मिळाले आहे.
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित 16 वर्षाखालील विभागीय क्रिकेट स्पर्धेत चमक दाखवलेल्या क्रिकेटपटूंची दखल घेऊन संभाव्य 48 क्रिकेटपटूंची यादी कर्नाटक संघटनेने घोषित केली आहे. या यादीत बेळगावचे सिद्देश असलकर, आकाश कुलकर्णी, आशुतोष हिरेमठ यांना स्थान देण्यात आले आहे. हे तिन्ही खेळाडू बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे असून त्यांना धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार व दीपक पवार यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक संगम पाटील, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील, प्रमोद पालेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. धारवाड येथे सराव करीत असलेला मनिकांत बुकीटगारलाही या यादीत स्थान मिळाले आहे. वरील 48 खेळाडूंमध्ये सराव सामने खेळविण्यात येणार असून, त्यामधून कर्नाटकचा 15 खेळाडूंचा अंतिम संघ घोषित होणार आहे.









