फॅशेनेट क्लबच्या जलतरण पटूंचे दसरा स्पर्धेत यश
बेळगाव : युवजन क्रीडा खाते व महिला सबलीकरण आयोजित जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धेत फॅशेनेट जलतरण स्पोर्टस अकादमीच्या जलतरण पटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. शर्मिष्ठा मालाईची म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोटरी मनपा जलतरण तलाव आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धेत फॅशेनेट क्लबच्या शर्मिष्ठा मालाईने 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक तर 400 मी. फ्रिस्टाईलमध्ये रौप्य पदक तर 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकाविले. यश पिजोलीने 100 मी बटरफ्लॉय व 400 मी फ्रिस्टाईल तिसऱ्या क्रमांकासह कास्य पदक पटकाविले. विनयकुमार गानीयालने 200 मी ब्रेस्टस्टोकमध्ये कास्यपदक सृष्टी कंग्राळकरने 200 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये कास्य पदक पटकाविले आहे. म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी शर्मिष्ठा मालाईची निवड झाली आहे. या सर्व जलतरण पटूंना एनआय जलतरण प्रशिक्षक शामसुंदर मालाई, संदीप मालाई यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.









