वार्ताहर/अगसगे
अगसगे प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी संदेश लक्ष्मण रेडेकरची कराटे स्पर्धेत राज्य पातळीवर निवड झाली आहे. शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग जिल्हा पंचायत बेळगाव आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षातील गटात 20 किलो वजन गटात उत्तम कामगिरी करून कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यामुळे संदेशची राज्यस्तरीय क्रीडा पातळीवरील स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ज्योतिबा घेवडी, सदस्य प्रमोद रेडेकर, महेश रेडेकर, संतोष मैत्री, मराठी शाळेचे मुख्याध्यापक मालती कांबळे, मुख्याध्यापक पुंडलिक चव्हाण, शिक्षक के. एल. पाटील, एस. डी. शिंदे, पी. एन. चव्हाण, एम. ए. जाधव, बसरवाडकर, लक्ष्मण रेडेकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.









