वार्ताहर/किणये
बहाद्दरवाडी गावची कन्या रिया कृष्णा पाटील हिने नुकत्याच बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या पदवीपूर्व विभाग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अडथळा शर्यत 100 मीटर द्वितीय क्रमांक व भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे रियाची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रिया ही मराठा मंडळ संचलित किणये येथील एस. जी. पाटील पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. या यशाबद्दल तिचा मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राज्यश्री नागराजू (हलगेकर) यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी प्राचार्य आर. पी. गोडसे उपस्थित होते.









