न्हावेली / वार्ताहर
महेंद्र अकॅडमीचा विद्यार्थी प्रशांत भाईडकर यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे.याबद्दल अकॅडमीचे प्रमुख श्री महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे स्वागत केले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत श्री.भाईडकर यांनी यश मिळविले आहे.ते निरवडे येथील आहेत पदवीनंतर त्यांनी नोकरी सांभाळून भरतीसाठी प्रयत्न केला होता.त्यात त्यांना यश आले आहे.
Previous Articleसावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची उद्या सावंतवाडीत बैठक
Next Article होडावडा येथे ४ डिसेंबर रोजी दुग्धाभिषेक सोहळा









