तुळस (वार्ताहर)-
राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला दिव्यांग क्रिकेट संघात तुळस गावची सुकन्या कु. प्राजक्ता माळकर हिची निवड झाली आहे. तुळस गावची सुकन्या कु. प्राजक्ता सुरेश माळकर हीची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली. याबद्दल कु. प्राजक्ता माळकर हीचा तुळस ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सौ. रश्मी परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्राजक्ता हिला स्पर्धेसाठी तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी, सरपंच सौ रश्मी परब, उपसरपंच सचीन नाईक, जयवंत तुळसकर, सौ.सुप्रिया परब, सौ.दिपा तांबोसकर, अरुण मांजरेकर, समर्थ तुळसकर, आपा तुळसकर उपस्थित होते.









