क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विश्व भारत सेवा समिती संचालित कर्ले येथील माध्यमिक विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी किरण यल्लाप्पा बुरुड हिने नुकताच कडोली येथे झालेल्या माध्यमिक शाळांच्या तालुका पातळीवरील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे तिची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलींच्या 48 किलो वजन गटात किरणने हे यश मिळविले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर, क्रीडा शिक्षक पी. के. शेळके व सहशिक्षकांचे सहकार्य लाभले.









