वृत्तसंस्था/ मुंबई
गुजरातचा सलामीवीर कथन पटेलची देवधर करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघात पृथ्वी शॉच्या जागी निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे.
26 वर्षीय कथन पटेलने लिस्ट एक क्रिकेटमध्ये 35.36 च्या सरासरीने 569 धावा जमविल्या असून त्यात दोन शतके व एका अर्धशतकाचा समावेश आहे. 2022-23 मोसमातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने सहा सामन्यात 278 धावा जमविल्या. त्यात एक शतक व एक अर्धशतकाचा समावेश आहे. देवधर करंडक वनडे स्पर्धा चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आली असून 24 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पुडुचेरी येथे खेळविली जाणार आहे. दुलीप करंडकात पश्चिम विभागाचे नेतृत्व करणारा प्रियांक पांचाळ हाच देवधर करंडकातही संघाचे नेतृत्व करणार आहे.









