वार्ताहर/ कणकुंबी
कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खानापूर तालुक्यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये वैभवी गावडे हिने 1500 मी. धावणेमध्ये तालुक्यात प्रथम, संजय चौगुलेने थाळीफेकमध्ये प्रथम, सुवर्णा गावडेने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांचे प्रोत्साहन तर सहशिक्षक बी. एम. शिंदे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.









