सुकृत मोकाशी /पुणे
आयपीएल क्रिकेट हे वैयक्तिक क्रिकेट आहे. यावऊन आंतरराष्ट्रीय संघामध्ये निवड करणे, ही एक अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आयपीएल क्रिकेटवरून खेळाडूची निवड न होता एखादा खेळाडू कसा खेळतो, कशा पद्धतीने खेळतो, तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे का, अशा त्याच्या खेळाच्या सर्व बाजू तपासूनच त्याची आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड केली जाते, असे मत माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना व्यक्त केले. याबाबत बोलताना बोर्डे म्हणाले, आयपीएल क्रिकेट हे वैयक्तिक क्रिकेट आहे. जेव्हा निवड समिती खेळाडूंची निवड करायला बसते. तेव्हा त्यांच्याकडे अलीकडील तंत्रज्ञानामुळे खेळाडूंचे सगळ्या फॉरमॅटमधील रेकॉर्ड्स उपलब्ध असतात. खेळाडूची कामगिरी निवड समितीचे सदस्य बघतात. त्यानुसार ठरविले जाते की त्याचा संघासाठी कसा उपयोग होईल. एकाच मॅचवरून खेळाडूचे भवितव्य ठरवू नये. याआधीची चेतेश्वर पुजाराची कामगिरी चांगली आहे. टॅलेंट कायम राहते, खेळाडूची क्षमता कमी होत नाही. कधीतरी एखादी कमतरता राहते, असेही त्यांनी सांगितले.
सर्व दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशीपची फायनल तीन मॅचची खेळवावी ही रोहित शर्माची कल्पना चांगली आहे. पण, खूप सिरीज खेळल्या जातात. वेळेचे बंधन असते. वेळेचा मोठा प्रŽ आहे. या सर्व दृष्टीकोनातून विचार होणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. एकदिवसीय क्रिकेट, टी-20 क्रिकेट हे मनोरंजनाचे क्रिकेट आहे. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही बोर्डे यांनी व्यक्त केली.









