बेळगाव : आसाम गुवाहाटी येथे होणाऱया 37 व्या सब ज्युनियर राष्ट्रीय ऍथलेटीक्स स्पर्धेसाठी सेंटपॉल्स हायस्कूलचा विद्यार्थी व खानापूर कुप्पटगीरीचा सुपुत्र भूषण पाटील याची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
गुवाहाटी येथे होणाऱया 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 110 मीटर अडथळा स्पर्धेत त्याची कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्याला डायनॅमिक क्लब, क्रिडा भारतीचे प्रशिक्षक उमेश बेळगुंदकर, सुरज पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तर वडिल सुनिल पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. या निवडीबद्दल भूषण पाटीलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









