बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते हावेरी यांच्या वतीने बेळगाव विभागीय स्तरीय हँन्डबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाचे प्रतिनिधीत्व करताना बालिका आदर्श संघाने बागलकोट जिल्हाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा स्टेडियम हावेरी येथे झालेल्या बेळगाव विभागात एकून 9 जिल्हाचा सहभाग होता.या स्पर्धेत बालिका आदर्श ही शाळा बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करत उपांत्य सामन्यात धारवाड जिल्हाचा 7-1 अशा फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना बागलकोट जिल्हाचा 9-1 आशा एकतर्फी पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. हा संघ पुढील महिन्यात तुमकूर जिह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संघात-वैष्णवी नावगेकर, वृषाली छपरे, प्रतिज्ञा मोहीते, अनन्या अनगोळकर, ऋतूजा सुतार, शिवानी शेलार, गीता शिंदे, समृद्धी पाटील, सेजल धामणेकर, श्र्रद्धा कणबरकर व सेंट झेवियर्स शाळेचे स्वरांजली पाटील, श्रावणी सुतार तर बेळगाव ग्रामीण मधील डिवाईन मर्सी शाळेचे अनुश्री, स्नेहा, अनुष्का, सेजल, सोनिया तर जोसेफ स्कूल सांतिबस्तवाड शाळेची अमृता आणि पल्लावी यांचा समावेश आहे. शिवानी शेलारने अंतिम सामन्यात सर्वाधिक 4 गोल केले व सेजल धामणेकरने 5 गोल नोंदवित हा सामना सहज जिंकला.या खेळांडूना शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर व शुभांगी काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









