आचरा प्रतिनिधी
आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची निवड वाचनालयात झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत बिनविरोध करण्यात आली.यावेळी बाबाजी भिसळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
वाचन मंदिरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संस्थेच्या ९ कार्यकारिणी सदस्यांची निवड केलेली होती. आज संस्थेत सदर सदस्यांची सभा होऊन अध्यक्षपदी बाबाजी भिसळे, उपाध्यक्षपदी अशोक कांबळी , कार्यवाहपदी अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाहपदी विरेंद्र पुजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, वैशाली सांबारी, उर्मिला सांबारी, दिपाली कावले हे कार्यरत रहाणार आहेत.नुतन पदाधिकारी आणि कार्यकारीणीचे ग्रंथपाल विनिता कांबळी, संस्थेचे कर्मचारी, सांस्कृतिक समिती सदस्यांनी अभिनंदन केले.









