वार्ताहर/किणये
भरतेश शिक्षण संस्था संचलित, हलगा येथील जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या हुडेद हिने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कमिटी सदस्य, मुख्याध्यापिका व सहशिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.









