50 कोटी रुपयांची होणार उभारणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टीव्ही, स्मार्टफोन, घड्याळ आणि बँडसारखी वेअरेबल उत्पादने, मोबाईल अॅक्सेसरीज आणि नेकबँड यांचे ब्रँडींग व वितरण करणारी कंपनी सेलेकोर गॅजेट्सचा आयपीओ शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी बाजारात खुला होणार आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी 50.77 कोटी रुपये उभारणार असून सदरचा आयपीओ 20 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 25 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयपीओकरिता समभागाची किंमत 87-92 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. 1200 समभागांचा एक लॉट असणार असून कमीतकमी 1 लाख 10 हजार 400 रुपये गुंतवावे लागणार आहेत. सदरच्या कंपनीचे समभाग भारतीय शेअर बाजारामध्ये 28 सप्टेंबरला सुचीबद्ध होणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनीची स्थापना 2020 मध्ये करण्यात आली असून कंपनीचा विस्तार 14 राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. सुरुवातीला पाचच राज्यांमध्ये कंपनीचा विस्तार होता. सुरुवातीच्या काळात फक्त मोबाईल उपकरणांची विक्री करण्यात येत होती पण आता कंपनी सर्वच कंझ्युमर इलेक्ट्रिक उत्पादने आणि गॅजेट्स यांची विक्री करते.









