वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मणिपूरमध्ये मागील काही काळापासून अशांततेचे वातावरण आहे. राज्यात तणाव कमी झाल्याचे वाटू लागताच तेथे हिंसक घटना घडत आहेत. अशा स्थितीत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी जोपर्यंत लुटण्यात आलेली 6 हजार शस्त्रास्त्रs हस्तगत होत नाही तोवर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
मणिपूरमध्ये लुटण्यात आलेली 6 हजार अत्याधुनिक शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा हस्तगत होईपर्यंत शांतता नांदणार नाही. राज्यात तीन मेपासून हिंसा सुरू आहे. तेथे सुरक्षा दलांकडून शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा लुटण्यात आला आहे. आता या शस्त्रास्त्रांचा वापर राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या विरोधात केला जात आहे. राज्यातील दोन्ही समुदायांमध्ये तडजोडीकरता कुठलीच चर्चा न झाल्याने शांतता कशी प्रस्थापित होणार असे प्रश्नार्थक विधान गोगोई यांनी केले आहे.
मैतेई आणि कुकी दोन्ही समुदाय मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्यावर नाराज आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मुख्यमंत्री सिंह यांना पूर्ण समर्थन दिले असून हा प्रकार दुर्दैवी आहे. शांतता समित्यांमध्ये मुख्यमंत्री सिंह यांच्या उपस्थितीमुळे शांतता चर्चा अपयशी ठरल्याचा आरोप गोगोई यांनी केला आहे.