Seema Deo Passes Away Entertainment Marathi News : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच दीर्घ आजारानं निधन झालं.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वाद्रे मधील त्यांच्या राहत्या घरी त्यांच निधन झालं. गेल्या वर्षी रमेश देव यांच निधन झालं होत. मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी निघून गेली अशा भावना चित्रपट सृष्टीसह चाहत्यांमधून उमटत आहेत.
रमेश देव आणि सीमा देव ही अजरामर जोडी होती. त्यांनी मराठीविश्व गाजवलं.सीमा देव यांनी 80 पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय केला.आनंद, कोशिश, कोरा कागजमध्ये अभिनय तर जगाच्या पाठीवर, मोलकरीण हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
सीमा देव यांचा अल्पपरिचय
जन्म- 27 मार्च 1942
मूळ नाव- नलिनी सराफ होतं
लग्नानंतर सीमा रमेश देव कायमच साथीला राहिल
1957 मध्ये अलिया भोगासी मधून सिनेक्षेत्रात प्रवेश केला.
अत्यंत वाईट गोष्ट घडली. अभिनयाची जाण असलेली सुंदर, देखणी नटी गेल्याने दु:ख होत आहे.पहिल्या चित्रपटापासून त्यांच्या अभिनयाने त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. शालीन अभिनेत्री निघून गेली. रमेश देव आणि सीमा देव अस समीकरणच होत.एक चांगल्या स्वभावाची व्यक्ती आज आपण गमावली, अशी प्रतिक्रिया जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दिली.याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी भावना व्यक्त केल्या.









