रत्नागिरी :
पूर्णगड सागरी हद्दीतील फिनोलेक्स जेटीसमोरील अरबी समुद्रात संशयास्पद तेलवाहू बार्ज आढळल्याने येथील किनाऱ्यावर खळबळ उडाली. या बार्जमुळे पोलीस, तटरक्षक दलाची धावपळ उडाली. चौकशीअंती हे बार्ज गोव्यातून तेल भरून बदलापूरकडे चालले असता बिघाड झाल्याने रनपार किनाऱ्यालगत नांगरण्यात आल्याचे समोर आले आहे.
हे बार्ज 3 जून रोजी गोव्यातील वास्को द गामा येथून तेल भरून बदलापूर येथे निघाले होते. 4 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान फिनोलेक्स जेटीजवळील अरबी समुद्रात येताच बार्जमधील बॅटरी व पाण्याच्या पंपामध्ये बिघाड झाल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने ते रनपार किनाऱ्यालगत आणण्यात आले. त्या बार्जवर संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने येथील किनाऱ्यावर गस्त वाढवण्यात आली होती. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास फिनोलेक्स कंपनीच्या कार्यालयातून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याला या बाबत माहिती देण्यात आली. फिनोलेक्स जेटीसमोरील अरबी समुद्रातून दुपारी 2 च्या सुमारास एक अनोळखी बार्ज, टग व छोडी होडी पुढे रनपारच्या दिशेने जात असल्याची खबर देण्यात आली.
संशयास्पद बार्ज दिसल्याने तेथील सुरक्षारक्षकाने शिट्टी वाजवून इशारा केला. मात्र बार्जवरील व्यक्तींनी कोणताही प्रतिसाद न देता ते पुढे निघून गेले. ते बार्ज संशयास्पद असल्याचे पोलिसाना कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस यंत्रणने खातरजमा करत बार्जवरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तींनी कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता.
या बार्जबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, कस्टमचे अधिकारी गायकवाड, बंदर खाते, तटरक्षक दल यांना कळवण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी समुद्रकिनारी 1/3 चा हत्यारी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत आदेश दिला आहे. दरम्यान, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून जातीनिशी लक्ष ठेवण्यात आले होते.
- लवकरच कंपनीचे मॅकेनिक दाखल होणार
गुरुवारी सकाळी तटरक्षक दलाची सी-452 हे बार्ज फिनोलेक्स जेटीजवळ आले. तटरक्षक दल अधिकाऱ्यानी त्या संशयित बार्जवरील लोकांशी संपर्क साधला असता त्या बार्जचे नाव Aन्न्ऱ्ख्ध् 5 (ऊल्g), Aन्न्ऱ्ख्ध्7 (ँदू), Aन्न्ऱ्ख्ध् 2 (आdgग्हु ंargा) असून या बार्जचे मास्टर चंचल यादव हे असल्याचे उघड झाले. तर त्या बार्जवर 12 खलाशी आहेत. मास्टर यादव यांचा मोबाईल क्रमांक 7022130970 असल्याची माहिती तटरक्षक अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळविली. आपण कंपनीशी संपर्क साधून बोटीतील बिघाडासंदर्भात कळवले आहे. लवकरच कंपनीचे मॅकेनिक दाखल होणार असल्याचे यादव यांनी सांगितले. तरीही पोलीस लक्ष ठेवून आहेत.








