कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात बी.ए.ला बोगस प्रवेश दाखवून त्याआधारे शिवाजी विद्यापीठाची बनावट पदवी तयार करून एका बहाद्दराने खुलताबाद येथील कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी व मानसशास्त्र विषयाचा पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून नियुक्ती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय शिक्षण उपसंचालक नागराज गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठाकडेही या सर्वच गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली असता शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांची या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे आमच्या विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाहीत. ही सर्वच कागदपत्रे बनावट आहेत, असे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी कळवले आहे.
खुलताबाद येथील कनिष्ठ महाविद्यालयात दोन विषयाच्या अंशत: अनुदानित सहशिक्षक पदावर एकाने व्यक्तीने नियुक्ती मिळवली. स्थानिक निवड समितीमार्फत झालेली ही नियुक्तीची प्रक्रिया एकाच दिवशी झाली.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव पाठवला गेला. संबंधिताने कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला प्रवेश दाखवला. 2018-19 मध्ये त्यांनी बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे दाखवली. 2019 मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने बी.ए.ची पदवी प्रदान केल्याचे दाखवले आहे. संबंधित महाविद्यालयाने या पत्रावर त्याच दिवशी तातडीने कार्यवाही करीत संबंधित आमच्या महाविद्यालयात प्रवेशितच नाही. त्याच्या गुणपत्रिकेतील विषयाचे कोड आणि महाविद्यालयात शिकवण्यात येत असलेल्या विषयाचे कोड वेगवेगळे आहेत, असे प्राचार्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यास कळवले आहे. संबंधिताने सादर केलेल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्या आहेत.
विवेकानंदमध्ये शिकवत असलेल्या विषयाचे कोड नंबर नाहीत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने या पत्रावर त्याच दिवशी तातडीने कार्यवाही केली आणि शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन हा विद्यार्थी सन 2016-17 ते 2018-19 या कालावधीत आमच्या महाविद्यालयात प्रवेशितच नाही. त्याच्या गुणपत्रिकेतील विषयाचे कोड आणि महाविद्यालयात शिकवण्यात येत असलेल्या विषयाचे कोड वेगवेगळे आहेत, असे विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी 17 मार्च 2025 रोजीच नागराज गायकवाड यांना पत्राद्वारे कळवले
खुलताबाद येथील एका व्यक्तीने नोकरीसाठी बीए, एमए. बी.एड. अभ्यासक्रमाची पुरविलेली गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतींची प्राथमिक पडताळणी करण्यात आली आहे. ही गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे त्या विद्यार्थास शिवाजी विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाहीत. ही गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे प्रथमदर्शी बनावट असल्याचे दिसते. तथापि, याची अंतिम पडताळणी केली जाणार आहे.
डॉ. अजितसिंह जाधव, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, शिवाजी विद्यापीठ








