ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलिसांनी अचानकपणे कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत 4 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत जमावबंदी लागू असेल. त्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 4 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारचा मेळावा, मिरवणूक, आंदोलने, घोषणाबाजी, सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घातली आहे. तसेच शस्त्रं, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रं बाळगण्यास बंदी असेल.
अधिक वाचा : संभाजीराजेंची संघटना आक्रमक; पुण्यात कोश्यारींना दाखवले काळे झेंडे
कोणत्या गोष्टींवर असणार बंदी?
- सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शने करण्यास बंदी
- क्लब, चित्रपटगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात एकत्र येण्यास मनाई
- फटाके फोडणे, लाऊडस्पीकर वाजवणे, वाद्ये व बँड वाजवण्यावर बंदी
- सर्व प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी
- बंदुक, तलवारी आणि इतर अशा शस्त्रांना परवानगी नाही.
- नाटकं किंवा संमेलनावर बंदी.
- शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रमांसाठी सभा घेण्यासही बंदी