सावंतवाडी: प्रतिनिधी
ग्रामपंचायत नाणोसच्या सरपंच श्रीमती प्राजक्ता उमेश शेट्ये यांच्याविरुद्ध संमत अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या अविश्वास ठरावानंतर, सदर ठरावावर गुप्त मतदानाद्वारे संमती घेतली जाणार आहे.या मतदान प्रक्रियेसाठी १० मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत नाणोस कार्यालयात विशेष ग्रामसभा आयोजित केली जाईल. मतदानानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. याबाबतच्या सर्व प्रक्रियेचे नियोजन सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी यांनी केले आहे.विशेष ग्रामसभेमध्ये फक्त सरपंचाविरुद्धच्या अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होईल, अन्य कोणतीही कामकाज या सभेत होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सर्व संबंधितानी याची नोंद घ्यावी व उपस्थित राहावे, असे आवाहन सह गटविकास अधिकारी सावंतवाडी पंचायत समिती यांनी केले आहे.









