वृत्तसंस्था / बेंगळूर
भारत अ आणि द. आफ्रिकेचा अ यांच्यातील चार दिवसांच्या दुसऱ्या अनाधिकृत कसोटी सामन्याला येथे गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या सामन्यात ऋषभ पंतकडे भारत अ चे तर बवुमा द. आफ्रिका अ संघाचे नेतृत्व करीत आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार पंतने समयोचित अर्धशतक नोंदवून आपल्या संघाला विजय मिळवून दिल्याने त्याची द. आफ्रिकाबरोबर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आता या दुसऱ्या अनाधिकृत सामन्यात मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना दर्जेदार कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. पंतने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 133 चेंडूत 90 धावा जमवित भारत अ संघाला विजय मिळवून दिला. आता 14 नोव्हेंबरपासून द. आफ्रिका व भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे.









