खेड /प्रतिनिधी
मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विद्युतीकरणासह अन्य प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंदच राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले. कशेडीच्या पहिल्या बोगद्यातून वाहतूक मात्र सुरू राहणार आहे.
Previous Articleपशुसंगोपन विभागाच्या कामकाजाचा जि. पं. सीईओंकडून आढावा
Next Article समस्या सोडवा; अन्यथा धरणे आंदोलन








