वृत्तसंस्था/ सिपेंग (मलेशिया)
2023 च्या आशियाई रोड रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची पहिली फेरी संपून तब्बल सात आठवड्यांचा कालावधी झाला असून आता या स्पर्धेची दुसरी फेरी मलेशियात होत आहे.
आशियाई रोड रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे होंडा रेसिंग इंडिया संघातील स्पर्धक मलेशियातील सिपेंग इंटरनॅशनल सर्किटमध्ये चालू आठवडा अखेरीस दाखल होत आहे. या चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्या फेरीत होंडा रेसिंग इंडिया संघातील स्पर्धकांनी आपल्या दुचाकी वाहनावरुन खडतर मार्ग पार करत पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. होंडा रेसिंग इंडिया संघाने पहिल्या टप्प्याअखेर एकूण 9 गुण घेतले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात या संघातील स्पर्धक पुन्हा दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.









