प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपने बुधवारी रात्री 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन महिला उमेदवारांचाही समावेश आहे. उर्वरित 12 मतदारसंघातील उमेदवार तिसऱ्या यादीत जाहीर होणार आहेत. उत्सुकता असलेल्या हुबळी-धारवाड सेंट्रल आणि शिमोगा शहर मतदारसंघातून अद्यात तिकीट जाहीर केलेले नाही. दुसऱ्या यादीत बिदरमधून ईश्वरसिंग ठाकूर, भालकीमधून प्रकाश खंडे, कलघटगीतून नागराज छब्बी आणि हानगल मतदारसंघातून शिवराज सज्जनर यांना तिकीट जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बसवण बागेवाडी-एस. के. बेळ्ळूब्बी, देवरहिप्परगी-सोमनगौडा पाटील-सासनूर, इंडी-कासगौडा बिरादार, गुरुमित्कल-ललीता अनपूर, गंगावती-परण्णा मुनवळ्ळी, हावेरी-गविसिद्धप्पा द्यामन्नवर, हरप्पनहळ्ळी-करुणाकर रे•ाr, दावणगेरे उत्तर-लोकिकेरे नागराज, दावणगेरे दक्षिण-अजयकुमार, मायकोंड-बसवराज नायक, चेन्नगिरी-शिवकुमार, बैयंदूर-गुरुराज गंठीहोळे, मुडिगेरे-दिपक दो•य्या, गुब्बी-एस. डी. दिलीपकुमार, शिड्लघट्ट-रामचंद्रगौडा, केजीएफ-अश्विनी संपंगी, श्रवणबेळगोळ-चिदानंद, अरसिकेरे-जी. व्ही. बसवराजू, हेग्गदेवनकोटे-कृष्णा नायक यांना उमेदवारी देण्यात आले आहे.









