वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या आठवड्यात देशात झालेला हा दुसरा भूकंप आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी 6:39 वाजता भूकंपाचे धक्के 50 किलोमीटर खोलीवर जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात अनेक घरांची पडझड झाली असून या आपत्तीतून अफगाणिस्तान अजूनही सावरलेला नाही. जीवितहानीचा आकडाही हजारोंच्या घरात पोहोचला असून अनेक जखमी लोक इस्पितळात उपचार घेत आहेत.









