वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टूरवरील सुरू असलेल्या शांघाय मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्दाने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने आपल्याच देशाच्या शेल्टनचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 26 व्या मानांकित कोर्दाने बेन शेल्टनवर 6-7(10-12), 6-2, 7-6(8-6) अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. अन्य एका सामन्यात पोलंडच्या हुबर्ट हुरकेझने हंगेरीच्या मॅरोझसेनचा 4-6, 6-1, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. कोर्दा आणि हुरकेझ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. दरम्यान या स्पर्धेत बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने स्पेनच्या द्वितीय मानांकित अल्कारेझचा 5-7, 6-2, 6-4 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे 22 व्या मानांति निकोलास जेरीने शुवार्झमनचा 6-3, 5-7, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.









