25 किलोमीटर लांबीचा रस्ता
वाहनाचा वेग असतो पूर्वनिर्धारित
रस्त्यावर कारमधून प्रवास करताना सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. सीटबेल्ट लावलेला नसल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. परंतु एका रस्त्यावर वाहन चालविताना तुम्हाला कायदेशीरदृष्टय़ा सीटबेल्ट लावण्यास मनाई आहे.
सर्वसाधारणपणे रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना सीटबेल्ट लावणे आवश्यक असते. परंतु इस्टोनियात एका 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सीटबेल्ट लावून प्रवास करणे बेकायदेशीर आहे. हा युरोपमधील सर्वात लांब आइस रोड आहे. म्हणजे या ठिकाणी रस्ता क्राँक्रिटने नव्हे तर गोठलेल्या बर्फाने तयार झाला आहे. येथे ड्रायव्हिंग करणाऱया लोकांना सीटबेल्ट लावण्यास मनाई असून वाहनाचा वेगही निर्धारित करण्यात आला आहे.

अत्यंत कमी वेग
युरोपमधील सर्वात लांब आइस रोड बाल्टिक समुद्राचे गोठलेले स्वरुप असून ते हाययुमा बेटाच्या किनारीभागात आहे. येथे ड्रायव्हिंग करणे खरोखरच एक वेगळा अनुभव आहे. परंतु येथे ड्रायव्हिंगशी निगडित नियम-कायदे देखील वेगळे आहेत. या रस्त्यावर ड्रायव्हिंग करायचे असल्यास सीटबेल्ट लावणे विसरावे लागते. याचबरोबर वाहनाचा वेग 25-40 किलोमीटदरम्यान ठेवावा लागतो. हे नियम लोकांच्या सुरक्षेसाठीच आहेत.
13 व्या शतकापासूनचा मार्ग
या मार्गाचा 13 व्या शतकात काही घोडेस्वारांनी ये-जा करण्यासाठी वापर केला होता. इस्टोनियात हिमवृष्टी मोठय़ा प्रमाणात होते, याचमुळे येथील लोकांना पायी प्रवास करण्याची सवय आहे. हिवाळय़ात लोक येथे वाहनांमधूनही येतात. तेव्हा बर्फ गोठून कठोर झालेला असतो. परंतु सूर्यास्तानंतर येथे ड्रायव्हिंग करण्यास मनाई आहे. बर्फ तुटण्याची भीती असल्याने वाहनाचा वेग कमी ठेवावा लागतो.









