1980 पासून 15 टक्क्यांची झाली घट
मिशिगन विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी 1980 ते 2023 दरम्यान उपग्रहांकडून प्राप्त आकडेवारीचे अध्ययन केले आहे. यात वातावरणात असलेल्या ढगांसोबत सागरी बर्फाद्वारे परावर्तिन सूर्यप्रकाशाचे विश्लेषण करण्यात आले. अध्ययनाच्या निष्कर्षानुसार सागरी बर्फाच्या विस्ताराच्या तुलनेत पृथ्वीला थंड ठेवण्याची त्याची क्षमता अधिक वेगाने कमी होत आहे. जियोफिजिकल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनानुसार आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये सागरी बर्फाच्या विस्ताराच्या तुलनेत त्याच्या वातावरणाल थंड करण्याच्या शक्तीत जवळपास दुप्पट घट झाली आहे.
2016 पासून अंटार्क्टिकामध्ये घडलेल्या बदलांमुळे सागरी बर्फाला मोठे नुकसान पोहोचत आहे. याच्यामुळे तापमान वृद्धी 40 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अशा स्थितीत आम्ही विकिरण प्रभावात येत असलेल्या बदलांवर विचार न केल्यास जागतिक ऊर्जा अवशोषणाचा एक मोठा हिस्सा गमावू शकतो अशी भीती संशोधक अलीशेर दुसपेव्ह यांनी व्यक्त केली आहे.
आर्क्टिकने शक्तीचा 27 टक्के हिस्सा गमावला
संशोधकांनुसार सागरी बर्फ वितळणे आणि त्याने सूर्यप्रकाशाला कमी परावर्तित केल्याने आर्क्टिकने 1980 पासून वातावरण थंड ठेवण्याच्या स्वत:च्या शक्तीचा जवळपास एक चर्तुंथश (21-27 टक्के) हिस्सा गमावला आहे. गायब होत असलेल्या बर्फाच्या आच्छादनासोबत शिल्लक बर्फ देखील कमी परावर्तक होत चालला आहे. बर्फाचे आच्छादनात जमा झालेले पाणी ताजे असते, याचमुळे जेव्हा बर्फाचे आच्छादन वितळून समुद्रात प्रवेश करते, तेव्हा ते समुद्राच्या पाण्याची लवणता, तापमान आणि या प्रकारच्या घनत्वाला बदलू शकते, यामुळे समुद्राचे परिसंचरण प्रभावित होऊ शकते. महासागरात सातत्याने बाष्पीभवन होत राहते आणि आसपासच्या हवेचे तापमान आणि आर्द्रतेला बदलत असल्याने हवामानाला विनियमित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.









