धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हिजन स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके अ संघ, एचडीएमसी अ धारवाड व निना स्पोर्ट्स संघाने आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. मजीद मकानदार, निनाद, शोएब नरेंद्र यांनी शतके झळकवली.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन संघ अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 342 धावा केल्या. शोएब व इ. नरेंद्र यांनी प्रत्येकी 113 धावा काढून शतके झळकवली. त्यांना शुभमने 35 व अमरने 16 धावा करुन सुरेख साथ दिली. आनंदतर्फे ज्ञानेश होनगेकरने 3 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना आनंद अकादमीचा डाव 35.5 षटकात 160 धावात आटोपला. त्यात विनोदने 68, सचिन शिंदे 36 धावा केल्या. बीडीकेतर्फे सौरभने 3 तर अमर घाळी व परान पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात बीडीके सी हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 45.4 षटकात सर्वगडी बाद 170 धावा केल्या. त्यात अविनाश डी. ने 51 तर शिखर शेट्टीने 21 धावा केल्या. एसडीएमसी धारवाडतर्फे परिक्षित उकुंडीने 4 तर आदर्श हिरेमठ, ओवेसखान व हणमंत मांगले यांनी प्रत्येक 2 गडी बाद
केले.
प्रत्युतरादाखल खेळताना एसडीएम धारवाड संघाने 32.2 षटकात 4 गडी बाद 171 धावा करुन सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात आदर्श हिरेमठने 76 तर नितिन बिल्लेने नादाब 62 धावा केल्या. बीडीकेतर्फे दिपकने 2 गडी बाद केले.
बेळगाव येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात निनाद स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात सर्वगडी बाद 281 धावा केल्या. त्यात मजीद मकानदारने 140 धावा करत शतक झळकवले. त्याला नवीन शिरगावीने 45 तर अभिशेक देसाईने 29 धावा करुन सुरेख साथ दिली. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे शालविन स्टॅनलेने 4 तर पुनित दिक्षितने 3 गडी बाद केले.
प्रत्युतरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाचा डाव 47.1 षटकात 241 धावात आटोपला. त्यात श्रीनाथ मानेने 89, अर्जुन पाटीलने 60 धावा केल्या. निनातेर्फे संतोष सुळगे पाटीलने 4 तर नाईक व प्रशांत मुजकेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









