ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ शिल्लक असल्याने या जागेवर पोटनिवडणूक होणार असून, त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. यापूर्वी या नावांसोबत मेधा कुलकर्णी आणि जगदीश मुळीक यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, त्यांची नावे आता मागे पडली आहेत. त्यामुळे स्वरदा बापट, मोहोळ आणि काकडे या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक वाचा : लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडून राजीनामा मागे
दरम्यान, या जागेसाठी मविआकडून काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव चर्चेत होतं. मात्र, कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.








